सुमारे 31 कोटींची वसुली : पिंपरी व आकुर्डी न्यायालयात आयोजन
पिंपरी – पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, दिवाणी व फौजदारी न्यायालय पिंपरी व पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथील न्यायालयात तसेच आकुर्डी येथील पिंपरी-चिंचवड महापालिका न्यायालय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले. त्याद्वारे पिंपरी न्यायालयात 158 खटले निकाली काढण्यात आले व रक्कम रुपये 3 कोटी अठ्ठावीस लाखांची वसुली करण्यात आली. तर आकुर्डी मनपा न्यायालयात शास्तीकर, पाणीपट्टी व इतर कर यामधील प्रकरणात तडजोड करून सुमारे रक्कम रुपये 28 कोटींची वसुली करण्यात आली.
या कार्यक्रमात न्यायालयातील मुख्य न्यायाधीश ए. यु. सुपेकर व सह न्यायाधीश एन. टी.भोसले व सह न्यायाधीश डी. आर. पठाण व आर. आर. काळे तसेच सहन्यायाधीश आर एन मुजावर यांच्या उपस्थितीत तर आकुर्डी न्यायालयामध्ये एस. बी. देसाई यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून ऍड. विलास कुटे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड. पी. एस. कांबळे होते. यावेळी पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुनील कडूसकर, उपाध्यक्ष ऍड. योगेश थंबा, सचिव ऍड. गोरख कुंभार, सहसचिव ऍड. अंकुश एम. गोयल, ऑडीटर ऍड. महेश टेमगिरे व सदस्य ऍड. रामचंद्र बोराटे, पूनम राऊत, ऍड. केशव घोगरे, सुनील रानवडे, निलेश ठोकळ व इतर वकील वर्ग उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना न्यायाधीश डी. आर. पठाण यांनी लोकन्यायालयाचे महत्त्व अधोरेखित केले. बारचे अध्यक्ष ऍड. सुनील कडुसकर यांनी जास्तीत जास्त पक्षकारांनी लोकन्यायालयात सहभागी होऊन जास्तीत जास्त खटले निकाली काढावेत, असे आवाहन केले.
पॅनल परिक्षक म्हणून ऍड. प्रियंका सुरवसे, ऍड. कल्याणी सोनवणे, ऍड. आम्रपाली दाहत, ऍड. मनिषा महाडीक, ऍड. निता सयाळ, ऍड. पद्मावती पाटील, ऍड. माधुरी दाते, ऍड. राजेश रणपिसे, ऍड. दीपक इंगळे, ऍड. विश्वेशवर काळजे, ऍड. सारिका आगळे यांनी काम पाहिले.