भाड्याचे पैसे न देता ग्राहकाची कॅबचालकाला मारहाण

पिंपरी – कॅबने प्रवास केल्यानंतर भाडे देण्यासाठी सुट्टे पैसे आणतो असे सांगून घरात गेलेला ग्राहक परत आलाच नाही. त्यामुळे ग्राहकाच्या घरी पैसे मागण्यासाठी गेलेल्या कॅब चालकाला तिघा जणांनी मिळून कोयता आणि बॅटने बेदम मारहाण करुन जखमी केले. ही घटना शुक्रवार (दि. 5) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दापोडीतील यश सहकारी गृहसंस्थेमध्ये घडली.

गणेश धोंडीबा सोनटक्के (वय-27, रा. हडपसर, मूळ रा. येणेगुर, जि. उस्मानाबाद) असे जखमी कॅब चालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गणेश याच्या तोंड ओळखीच्या तीन इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश हे कॅब चालक आहेत. शुक्रवारी आरोपींनी गणेश यांच्या कॅब मधून खराडी ते दापोडी असा प्रवास केला. गाडीभाड्याचे सुट्टे पैसे आणतो म्हणून घरात गेला तो परत आलाच नाही. पैशांसाठी गणेश थांबल्याचे पाहून आरोपीच्या घरातून सुरुवातीला दोघेजण बाहेर आले आणि त्यांनी गणेशला हाताने आणि बॅटने मारहाण केली. तसेच गणेश याचा मोबाईलही फोडला. तसेच कॅबमधून आलेल्या ग्राहकाने गणेश यांच्या हातावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)