कार खरेदीच्या बहाण्याने गंडा

पिंपरी – फॉर्च्युनर कार खरेदीच्या बहाण्याने एकाला चौघा जणांनी मिळून तब्बल साडेसहा लाखांचा गंडा घातला. ही घटना कासारवाडीतील केशवनगरमध्ये घडली. याप्रकरणी महम्मद सर्फराज गौस मालदार (वय-32, रा. केशवनगर, कासारवाडी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीे. त्यानुसार, महम्मद अहमद हुसेन शेख, महम्मद युसुफ हुसेन शेख, महम्मद शौकत हुसेन शेख आणि नईम (सर्व रा. जामुना गंज कॉलनी, चारमिनार, आंध्रप्रदेश) या चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महम्मद गौस मालदार यांच्याकडे फॉर्च्युनर कार होती. ही कार विकण्यासाठी त्यांनी आरोपीसोबत साडेआठ लाख रुपयांमध्ये व्यवहार केला होता. व्यवहार झाल्यानंतर आरोपींनी फिर्यादी महम्मद याला रोख 2 लाख रुपये दिले. तर उरलेली साडेसहा लाखांच्या रकमेचा धनादेश दिला. धनादेश बॅंकेत भरण्यास सांगितले व कार घेवून आरोपी निघून गेले. मात्र धनादेश बॅंकेत वठलाच नाही. महम्मद यांनी आरोपींना फोन केला असता त्यांनी तो फोन उचलला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महोम्मद यांनी पोलिसांत धाव घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)