पिंपरी – देशी दारुच्या दुकानात भांडणे करुन दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवून दुकानातील 80 हजार रुपयांची रक्कम चोरुन नेली. ही घटना दि. 5 जुलै रोजी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चिंचवड येथील थरमॅक्स चौकातील एका देशी दारुच्या दुकानात घडली.
या प्रकरणी साजन हरिदास धंन्दर (वय-28, रा. निगडी) याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अनोळखी 2 इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी हे चिंचवड येथील थरमॅक्स चौकातील देशी दारुच्या दुकानात कामाला आहेत. दुकानात दोन अनोळखी इसम आले. त्यांनी संगनमत करुन दुकानात भांडणे केली. त्यातील एकाने फिर्यादी साजन यांना कोयत्याचा धाक दाखवला व दुसऱ्याने दुकानाच्या गल्ल्यातील 80 हजार रुपये व फिर्यादी याचा मोबाईल असा 82 हजार रुपयाचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला.