ब्लॅकमेलिंग करून तरुणीवर अत्याचार

पिंपरी – एका 20 वर्षाच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तिच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंध प्रस्थापित केले. तरुणीला न कळत त्याचे चित्रीकरण केले. आणि घरच्यांना ती चित्रफीत दाखवण्याची धमकी देऊन वेळोवेळी विविध ठिकाणी नेऊन बलात्कार केला. ही धक्कादायक घटना दिघी येथे उघड झाली. याप्रकरणी पीडित तरुणीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मालेश्‍वर कावडे या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

28 एप्रिल ते मे 2019 या कालावधीत मालेश्‍वर याने पीडित तरुणीसोबत प्रेमाचे नाटक केले. तिच्यासोबत जबरदस्ती शरीर संबंध प्रस्तापित केले. त्याचे न कळत चित्रीकरण केले. तसेच ती चित्रफीत तुझ्या घरच्यांना दाखवीन अशी धमकी देत ब्लॅकमेल केले. आणि वेळेवेळी आकुर्डी प्राधिकरण, स्पाईन रोड, आळंदी आणि डुडुळगाव या ठिकाणी नेऊन बलात्कार केला. मालेश्‍वर अद्याप फरार आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. एन. माने करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here