पिंपरी – कामगारांचे पैसे देण्याच्या कारणावरुन झालेल्या वादात एकाला फाइटरने मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना 19 जून रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मोशी येथील वजनकाट्याजवळ घडली. याप्रकरणी
ओमप्रकाश रामसवारी वरुण (वय-31 रा. जाधववाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन फैजल चौधरी (वय-19 रा. चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये लेबरचे पैसे देण्यावरुन वाद होता. फैजलने ओमप्रकाशला जखमी केले.