पिंपरी – एका 60 वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या मोबाईलवर अश्लील संदेश पाठवून तिच्याकडे एकाने शरीरसुखाची मागणी केली. ही घटना कासारवाडी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन संतोष भाऊसाहेब बोऱ्हाडे (रा. कॅनॉल जवळ, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या मोबाईलवर आरोपीने अश्लील संदेश पाठवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. तसेच महिलेच्या कार्यालयात जाऊन तेथे कोणीही असल्यास अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याची धमकी दिली. पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नसून भोसरी पोलीस अधिक तपासकरीत आहेत.