पिंपरी – घर बांधण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावत विवाहितेचा छळ केल्याची धक्कादायक घटना मार्च 2019 ते 4 जून 2019 या कालवधीत खेड तालुक्यातील दौंडकरवाडी या ठिकाणी घडली. पती प्रवीण दौंडकर, सासू कमल दौंडकर, सासरे जानकू दौंडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 24 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सासरच्या लोकांना बंगला बांधायचा असल्याने विवाहित महिलेने हुंड्यापोटी पाच लाख रुपये आणावेत असा तगादा सासरच्या मंडळींनी सातत्याने लावला होता. या रक्कमेसाठी तिचा छळही सुरू होता. याशिवाय महिला नोकरी करत असल्याचे तिचा संपूर्ण पगार आपल्या हातात द्यावा, या कारणावरुन आरोपी फिर्यादी महिलेला सातत्याने शिवीगाळ करत मारहाण करत होते.