अग्निशमन दलाच्या सक्षमीकरणासाठी पालिकेचे पाऊल

पिंपरी – शहराच्या सुरक्षेसाठी धाव घेणाऱ्या अग्निशमन दलाच्या सक्षमीकरणासाठी महापालिकेने पाऊले उचलली आहेत. महापालिकेच्या सर्व अग्निशामक केंद्रांमध्ये आणि अग्निशमन वाहनांवर अत्याधुनिक आय. पी. बेस इयुप्लेक्‍स प्रणालीची वायरलेस यंत्रणा उभारण्यात येणार आहे. ही यंत्रणा उभारण्यासाठी 34 लाख रूपये खर्च होणार आहे.

पिंपरी – चिंचवडची लोकसंख्या सध्या 20 लाखाच्या आसपास आहे. शहरात झोपडपट्ट्यांबरोबरच दाट लोकवस्तीचा भाग मोठ्या प्रमाणात आहे. टोलेजंग इमारतीही शहरात आता उभ्या राहत आहेत. याशिवाय शहरातून पवना, मुळा, इंद्रायणी या तीन नद्या वाहतात. महापालिका अग्निशामक दलाचे संत तुकारामनगर येथे मुख्य केंद्र असून भोसरी, रहाटणी, प्राधिकरण येथे उपकेंद्रे आहेत. शहरात एखादी दुर्घटना घडल्यास जिवित व वित्तहानी वाचविणे, आपत्कालीन व्यवस्थापन करणे, अग्निशमन, अग्नि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, पावसाळ्यात पूरपरिस्थिती ओढवल्यास पूरनियंत्रण आणि बचावकार्य करणे आदी विविध कर्तव्ये पार पाडावी लागतात. 24 तास अग्निशमन सेवा पुरवावी लागते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लिफ्टमध्ये अडकलेल्यांची सुटका करण्यापासून घरगुती स्वयंपाकाच्या सिलींडरची गळती झाल्यास ती रोखणे, विहिरीत किंवा नदीत बुडालेल्यांना बाहेर काढणे, झाडावर किंवा इमारतींवर अडकलेल्या पक्षांची सुटका करणे यांसारख्या आपत्कालीन वर्दीसाठीही अग्निशामक दलाला सतत सुसज्ज व दक्ष रहावे लागते. त्यासाठी अत्याधुनिक बचाव, सुरक्षा साधनांची गरज भासते.

ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या सर्व अग्निशामक केंद्रांमध्ये आणि अग्निशमन वाहनांवर अत्याधुनिक आय. पी. बेस इयुप्लेक्‍स प्रणालीची वायरलेस यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छूक ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. निविदा खर्च 35 लाख 36 हजार रूपये अपेक्षित धरण्यात आला. त्यानुसार, एकूण तीन निविदा प्राप्त झाल्या. त्यामध्ये प्रथमेश एंटरप्रायजेस यांनी निविदा दरापेक्षा तीन टक्के कमी म्हणजेच 34 लाख 30 हजार रूपयांची निविदा सादर झाली. इतर ठेकेदारांपेक्षा हा दर कमी असल्याने प्राप्त दर स्विकृत करण्यास विद्युत विभाग सहशहर अभियंता यांनी मान्यता दिली आहे.

मानधनावर कर्मचारी नेमणार

महापालिका अग्निशामक विभागात काही कारणांनी वाहने नादुरूस्त झाल्यास किंवा वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास तात्काळ दुरूस्ती करणे आवश्‍यक असते. ही बाब लक्षात घेऊन अग्निशामक दलाकरिता पंप मॅकॅनिक, मोटार मॅकॅनक, कनिष्ठ अभियंता अशा एकूण सहा तांत्रिक कर्मचाऱ्यांना सहा महिने कालावधीकरिता मानधनावर घेण्यात येणार आहे.

अग्निशामक विभागाचे तांत्रिक स्वरूपाचे कामकाज, तीन पाळ्यांमध्ये 24 तास अग्निशामक वाहनांची कामकाजाची गरज लक्षात घेता अग्निशामक दलाकरिता पंप मॅकॅनिक (2), मोटार मॅकॅनिक (3), कनिष्ठ अभियंता (1) अशा एकूण सहा तांत्रिक कर्मचाऱ्यांची सहा महिने कालावधीकरिता मानधनावर निवड करण्यात येणार आहे. स्थायी समितीने पद भरतीला हिरवा कंदील दाखविला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)