पिंपरी : परिचारिकांच्या समस्या सोडविण्यास कटिबद्ध

वायसीएम रुग्णालय :जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उदघ्‌ाटन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आद्यपरिचारीका फ्लॉरेज नाईटिंगेल यांना आदरांजली वाहण्यात आली

महापौर राहुल जाधव यांचे आश्‍वासन; परिचारिक दिन उत्साहात

पिंपरी – प्रत्येक रुग्णालयातील परिचारिका कुटुंबातील सदस्याप्रमाणे रुग्णांची सेवा करतात. परिचारिका रुग्णसेवेचे व्रत अखंडपणे जोपासत असतात. तसेच, महापालिकेच्या रुग्णालयातील परिचारिकांच्या समस्या लवकरात-लवकर सोडवू असे आश्‍वासन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव यांनी दिले.

जागतिक परिचारिका दिनानिमित्त महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात जाधव बोलत होते. यावेळी, वायसीएम’चे वैद्यकिय उपाधीक्षक डॉ. शंकर जाधव, मोनिका चव्हाण, माया गायकवाड, नर्सेस युनियनच्या अध्यक्षा सविता निगडे, यांच्यासह रुग्णालयातील परिचारिका व ब्रदर विजय मुंडे उपस्थित होते.

जाधव म्हणाले, रुग्णालयातील प्रत्येक रुग्ण व नातेवाईकांवर उपचार करुन दिलासा देण्याचे काम परिचारिका करतात. महापालिकेच्या रुग्णालयातील परिचारिकांचे मानधन, नोकर भरती, कायम तत्वावर घेण्यासंबंधात पुढील काही दिवसात निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करू.

डॉ. जाधव म्हणाले, परिचारिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. परिचारिका या सामाजिक कार्य म्हणून काम करत असतात. प्रत्येक रुग्णाला कौटुंबिक सदस्य या नात्याप्रमाणे मदत करतात. रुग्णसेवेचा वसा घेतलेल्या परिचारिकांना रुग्णांच्या नातेवाईकांनीही सहकार्य करण्याची आवश्‍यकता आहे. प्रत्येक रुग्णांवर मातेप्रमाणे सेवा करणारी परिचारिका असून आजपर्यत वायसीएम रुग्णालयातील नाविन्यपूर्ण बदलाला प्रत्येक परिचारिकेचे सहकार्य लाभले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)