निगडीमध्ये 4 एप्रिलला एनडीए प्रवेश परीक्षेसाठी मेळावा

निगडी – स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे एनडीएमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना त्याची माहिती देण्यासाठी 7 एप्रिल रोजी मेळावा आयोजित केला आहे.

निगडी, प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या सभागृहात 7 एप्रिल रोजी सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारा या वेळेत हा मेळावा होणार आहे. ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन आणि ब्रिगेडियर (निवृत्त) बलजीतसिंग गिल हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सावरकर मंडळाच्या स्पर्धा परीक्षा विभागामार्फत एनडीए प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारीसाठीचा 22 एप्रिल ते 2 जून 2019 या कालावधीत प्रशिक्षण वर्ग घेतला जाणार आहे.

दरवर्षी हा उपक्रम घेतला जातो. एनडीए तसेच सैन्य दलातील करिअरच्या संधी, त्याच्या प्रवेश प्रक्रिया व स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी प्रशिक्षण सावरकर मंडळामार्फत घेतले जाते. दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी तसेच अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी देखील या प्रशिक्षण वर्गासाठी पात्र ठरू शकतात. राज्यभरातून विद्यार्थी मेळाव्यास येतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)