वणव्यात होरपळलेल्या झाडांना संजीवनी!

अनोखा उपक्रम : प्लॅस्टिक बाटल्यांचा तिकोना गडावर वृक्षसंवर्धनासाठी वापर


श्री शिवदुर्ग, गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेची धडपड

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कामशेत – श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था आणि वडगाव मावळची गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था यांच्या माध्यमातून तिकोना गडामार्गावर पावसाळ्या पूर्वी वृक्ष रोपणाचा कार्यक्रम झाला होता. या वेळी विविध देशी झाडे लावण्यात आली होती.
मागील महिन्यात काही लोकांनी लावलेल्या वणव्यात बहुतेक झाडे जळाली, तर या वणव्यातून काही झाडे वाचली. या वाचलेला झाडांना पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने या दोन्ही संस्थांनी गडावर आढळणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या प्लॅस्टिक बाटल्यांचा ठिबक सिंचन पद्धतीने उपयोग करून गडावरील वृक्ष संपदा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक तर होतच आहे, शिवाय असा उपक्रम अन्य गडकिल्ले व पुरातन वस्तू परिसरात राबवला तर निसर्ग बहरेल, असे मत जाणकार व्यक्‍त करीत आहेत.

पवनानगर भागातील किल्ले तिकोनावर मागील काही वर्षांपासून पुणे येथील श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था आणि वडगाव मावळ येथील गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था गडसंवर्धनाचे काम करीत आहे. यामध्ये त्यांनी किल्ल्यावर जाणाऱ्या पाहिऱ्या पासून अन्य अनेक कार्य केले आहे. दर रविवारी सर्व एकत्र येवून त्यांचे गड संवर्धनाचे कार्य सुरू आहे.

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी सुतळी व बाटलीचा वापर करून झाडांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देण्याची नवीन कल्पना पहायला मिळाली. त्या अनुषंगाणे प्रयोग करून पाहिला असाता त्यात काही त्रुटी आढळल्या. त्या दुरुस्त करून तिकोना गडावर सर्व झाडांच्या मुळाशी एक बाटली ठेउन झाडांना पाण्याची सोय करण्यात आली. या पद्धतीमुळे झाडांना 24 तास पाणी उपलब्ध होत आहे.

झाडाच्या पायथ्याशी ठेवलेली बाटली दोन दिवस चालेल म्हणजे रोज बाटली भरण्याचे काम करावे लागणार नाही. कमी कष्टात महत्वाचे काम होईल. आणि गड किल्ल्यांवर वृक्षसंपदा बहरेल, असे नियोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या सभासदांनी सांगितले. या पद्धतीमुळे लावलेली झाडे जगतील आणि गडावर वृक्षसंपत्ती वाढीबरोबर प्लॅस्टिक बाटल्यांचा योग्य वापर होईल.

“तिकोना किल्ल्यावर आम्ही 110 झाडे लावलेली आहेत. ही झाडे उन्हाळ्यात जगविण्यासाठी त्यांना पाण्याची आवश्‍यकता असते. किल्ल्यावरील झाडे वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने झाडांना ठिबक करणे शक्‍य झाले. झाडे वाचवण्यासाठी आम्ही पाण्याच्या बाटल्या वापरल्या आहेत, त्यामुळे झाडाच्या मुळाशी नियमित व पुरेसे पाणी पोहचते, त्यामुळे गडावरील झाडांना जीवदान मिळाले आहे.
– विनायक रेणके ,अध्यक्ष, श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)