महापालिकेकडून चिखली प्रकल्पातील 168 लाभार्थ्यांची ‘घरकुल’ सोडत

पिंपरी – केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्राधिकरण सेक्‍टर क्रमांक 17 व 19 चिखली येथे आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत असलेल्या घरकुल प्रकल्पातील चार सोसायटयांच्या इमारती मधील एकूण 168 लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते काढण्यात आली.

चिंचवड येथे झालेल्या संगणकीय सदनिका सोडती वेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, सहायक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, प्रशासन अधिकारी रविंद्र जाधव, कार्यालयीन अधिक्षक महेंद्र चौधरी, मुख्य लिपिक सुनील माने, राजेश जाधव, संगणक चालक सुजाता कानडे, लिपिक सुवर्णा केदारी, संकेत लोंढे, महेमुद शेख तसेच घरकुल समन्वयक अशोक हंडीबाग व दर्शन शिरुडे यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लाभार्थींना आता हक्काचे व स्वत:चे घर मिळाल्याने इमारतीमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करावे. परिसर स्वच्छ ठेवावा. इमारत भोवती झाडे लावून त्याचे योग्य प्रकारे निगा व जतन करावे, असे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले. चंद्रकांत इंदलकर यांनी प्रकल्पाची माहिती, घराचा वापर, येणारे देयके व बॅंकेचे हप्ते वेळेवर भरण्याबाबत मार्गदर्शन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)