पिंपरीचिंचवड – रहाटणीत भरदिवसा व्यावसायिकावर गोळीबार

पिंपरी – रहाटणी येथील एका सराफी व्यावसायिकावर दुकानात घुसून अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात व्यावसायिकाच्या उजव्या पायाला गोळी लागली आहे. कोकणे चौक येथे बुधवारी (दि. 6) दुपारी एकच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, आरोपीचा शोध सुरू आहे.

दिव्यांग प्रदीप मेहता (वय 24, रा. रहाटणी) असे जखमी व्यावसायिकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी मधील कोकणे चौकाजवळ पुणेकर ज्वेलर्स हे दुकान आहे. आज दुपारी एकच्या सुमारास दोघेजण दुकानात आले. त्यांनी दुकानाचे शटर आतून बंद केले. त्यांनी व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला आणि दुकानातील सोन्याचे दागिने गोळा केले. चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर काढून नेला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या वेळी झालेल्या झटापटीत चोरट्यांनी गोळीबार केला. यामध्ये दिव्यांग यांच्या पायाला गोळी लागली. चोरट्यांनी दुकानात लावलेले आणि दुकानातील तिजोरीत ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. मात्र किती सोने गेले हे अद्याप समोर आलेले नाही. दिव्यांग मेहता यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा, खंडणी व दरोडा विरोधी पथकाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आरोपींचा शोध सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)