पिंपरी -मोरवाडी परिसरात मोपेड दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी तरुणाचा आयफोन पळवला. ही घटना शुक्रवार दि. 10 मे रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मोरवाडी येथील बस स्टॉपजवळ घडली.
अमित रामकृष्ण रस्तोगी (वय- 37, रा. मोरवाडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 2 अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी अमीत हे शुक्रवारी संध्याकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मोरवाडी येथील बस थांब्याजवळ थांबले होते. त्यावेळी मोपेड दुचाकीवरुन आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या हातात असलेला आयफोन 8 प्लस (किं. 30 हजार) जबरदस्तीने चोरुन नेला.