आळंदीत सुवर्णकार समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन

दहावे पंचवार्षिक दोन दिवसीय अधिवेशन शनिवारी व रविवारी

आळंदी – दहावे पंचवार्षिक राज्यस्तरीय दोन दिवसीय अधिवेशनाचे आयोजन यंदा आळंदीत करण्यात येत आहे. आळंदी येथील अखिल देशस्थ दैवज्ञ सोनार समाज प्रांतिक मंडळ, आळंदी देशस्थ दैवज्ञ सोनार समाज, पुणे परिमंडळ व श्री संत नरहरी सेवा संघ पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्‍त विद्यमाने दहावे पंचवार्षिक राज्यस्तरीय दोन दिवसीय अधिवेशनाचे आयोजन केले असल्याचे अधिवेशन प्रमुख संतोष खोल्लम यांनी सांगितले.

गोपाळपुरातील आळंदी येथील देशस्थ दैवज्ञ सुवर्णकार धर्मशाळा येथे शनिवारी (दि.12) व रविवारी (दि. 13) हे अधिवेशन होणार आहे. तसेच कै.सौ. मालती व अरविंद खोल्लम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भक्‍त निवासाचे उद्‌घाटन होणार आहे. शनिवारी पाटस येथील सुमन घोडेकर व वंदना घोडेकर यांचे हस्ते अधिवेशनाचे उद्‌घाटन होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण फाकटकर असणार आहेत, तर प्रमुख पाहुणे म्हणून चिमण खोल्लम सर्व खात्यांचे अध्यक्ष आदी उपस्थित राहणार आहेत. सकाळच्या सत्रामध्ये रमेश वाळुंज हे सुखी जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर चर्चा होणार असून, त्यांच्या अध्यक्षस्थानी उर्मिला बेल्हेकर असणार आहेत. तर अनिल वाघाटकर यांचे सोनार व्यवसायावर व संगिता निघोजकर यांचे स्त्री-शक्‍ती सबलीकरण या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

दुपारच्या सत्रात आमित कापाळे यांचे ताण तणावाचे व्यवस्थापन, स्वप्नील खोल्लम यांचे स्पर्धा परीक्षा व डॉ.प्रितमकुमार बेदरकर तरुणाई सहभाग आणि विकास या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. रविवारी दुपारी तीन वाजता सोनार व्यवसाय यावर मार्गदर्शनाने सुवर्णकार समाजाची दोन दिवसीय अधिवेशनाची सांगता होणार असल्याचे संयोजकांतर्फे सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)