पिंपरी : आयुक्‍तांची शिस्त अन्‌ कर्मचाऱ्यांची तारांबळ

तत्पर कार्यवाहिला मनुष्यबळ व अपुऱ्या वाहनांचा खो

पिंपरी – पिंपरी-चिंचवड आयुक्‍त आर.के. पद्मनाभन यांनी आयुक्‍तालयाचा चार्ज स्विकारताच शिस्तीचा बडगा उगारला आहे. कारण त्यांच्या या शिस्तीला मुळात अपुरे मनुष्यबळ व अपुऱ्या वाहनांचा फटका बसत आहे. त्यामुळे “तक्रारीला त्वरीत प्रतिक्रिया’ या त्यांच्या धोरणाच्या पुर्ततेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांची मात्र पुरती दमछाक होत आहे.

आयुक्‍तांनी सुरुवातीला शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी त्यांनी हिंजवडी व तळेगाव येथे वर्तुळाकार वाहतूक केली तर विरुद्ध दिशेने येणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा गुन्हेगारीकडे वळवला. यामध्ये त्यांनी नागरिक पोलिसांमधील संवाद वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी त्यांचे आहे ते मनुष्यबळ कामाला लावले.

यामध्ये “फोन अ फ्रेन्ड’ हा या पोलिसांच्या उपक्रमावर त्यांनी भर दिला. तक्रारदाराचा फोन येताच अवघ्या काही मिनिटात तेथे पोलिसांनी पोहचणे अपेक्षित आहे. यामध्ये स्त्री अत्याचार, मारामारी, लुटमार अशा गुन्ह्यांना मुळात आळा बसविण्याचा मानस आयुक्तांचा होती. त्यानुसार सुरुवात झालीही मात्र काही पोलीस ठाण्यामध्ये घटनास्थळी उशिरा पोहचल्याचे निदर्शनास येताच आयुक्‍तांनी त्यांची शाळा घेण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांनी गेल्या आठ दिवसात सुमारे 300 ते 400 पोलिसांना उन्हात उभारणे किंवा परेड कऱण्याची शिक्षा दिली आहे.

तर दुसऱ्या बाजूला पोलीस ठाण्यांमध्ये रात्री मनुष्यबळ कमी असल्यास किंवा एका एखादे पथक कॉलवर गेले असता दरम्यान दुसरा तक्रारीचा कॉल आला की कोठून पथक पाठवणार असा प्रश्‍न पोलीस ठाण्यांसमोर उभा राहत आहे. यामध्ये पहिल्या तक्रारीचे निवारण करून दुसरी तक्रारीच्या घटनास्थळी जाण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलीच धावपळ करावी लागत आहे. अपुऱ्या मनुष्यबळाबरोच त्वरीत पोहचण्यासाठी नादुरुस्त गाड्या हे देखील मुख्य अडथळा ठरत आहे. त्यामुळे वेळेत पोहचणे पोलिसांना थोडे जिकीरीचे जात आहे. दरम्यान आयुक्तालयाच्या अतंर्गत होणारे बदल, बदल्या, वरिष्ठांची मर्जी राखणे, अशा प्रकारांचाही पोलीस कारवाईला अडथळा ठरत आहे.

“मनुष्यबळ अपुरे आहे हे वास्तव आहे. उपलब्ध मनुष्यबळात कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न सुरु आहे. नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होणे गरजेचे आहे. नागरिकांच्या तक्रारी ऐकून निरसन करण्याचा प्रयत्न करणे माझे कर्तव्य आहे.

– आर.के. पद्मनाभन, पोलीस आयुक्‍त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)