चाकणमधील मराठा समाजचे उपोषण स्थगित

चाकण – महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान दाखल करण्यात आलेल्या निरपराध तरुणांवरील गुन्हे विनाशर्त मागे घेण्यात यावेत यामागणीसाठी जाहीर केलेले उपोषण पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आश्‍वासनानंतर स्थगित करण्यात आले.दरम्यान, कोरेगाव भीमा दंगलीच्या धर्तीवर समिती स्थापन करावी व इतर काही मागण्यांचे निवेदन चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना यावेळी देण्यात आले.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर ,मनोहर वाडेकर,माजी आमदार दिलीप मोहिते,अशोक मांडेकर, कालिदास वाडेकर, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे, भगवान मेदनकर, बाबा राक्षे, अंकुश राक्षे, शंकर राक्षे, प्रीतम परदेशी, राहुल नायकवाडी, गणेश पऱ्हाड, अतिष मांजरे, निलेश पानसरे, बाबाजी कौटकर, गणेश मांडेकर, विजय खाडे, रत्नेश वैरागे यांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात मराठा आंदोलकांची अटकसत्र त्वरित थांबविण्यात यावे तसेच शासन, मराठा समन्वयक , व पत्रकार यांची समिती स्थापन करण्यात यावी असे नमूद केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर निवेदन स्वीकारल्यानंतर सुनील पवार म्हणाले , समिती स्थापन करण्याचा सर्वस्वी निर्णय हा वरिष्ठ अधिकारी घेतील तसेच तपासामध्ये अडथळे निर्माण होऊ नये म्हणून सीसीटीव्ही फुटेज दाखवता येणार नाही मात्र, तुमच्या मागण्यांचे निवेदन हे वरिष्ठ कार्यालयात पाठवून देणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)