मावळ : संत संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी सुदुंबरे येथे साजरी

इंदोरी -तेली समाजाचे आराध्यदैवत संत संताजी महाराज जगनाडे यांची 330 वी पुण्यतिथी सदुंबरे मावळ येथे साजरी करण्यात आली. या वेळी महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून हजारो समाजबांधव सदुंबरे येथे दाखल झाले होते. या पुण्यतिथी सोहळ्याच्या उत्सवानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छोटे बंधू पंकज मोदी उपस्थित होते.

या वेळी माजी मंत्री जयदत्ता क्षीरसागर, व्यासपीठावर भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, संस्थानचे अध्यक्ष शिवदास उबाळे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, नगरसेवक बापूसाहेब भेगडे, उत्सवाध्यक्ष रोहिदास उबाळे, राजेंद्र तेली, कार्याध्यक्ष विजय रत्नपारखी, वसुंदराताई उबाळे, इंदोरी गावचे माजी उपसरपंच प्रशांत भागवत, शैलेश मखामले, सुलोचना कर्डिले, विमल वाव्हळ, दिलीप चिलेकर, सदुंबरे गावच्या सरपंच वैशाली गाडे, उपसरपंच जालिंदर गाडे आदी उपस्थित होते.

संताजी महाराजांच्या समाधी दर्शन व प्रतिमा पूजन करुण कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले संताजी महाराज जगनाडे यांचे बहूउद्देशीय कार्यालयाचे उद्‌घाटन यावेळी झाले. सदुंबरे संस्थानसाठी राज्य सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून एक कोटी मिळवून देणार, असे आश्‍वासन विजय चौधरी यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थानचे मुख्य सचिव ऍड. राजेश येवले यांनी केले. सूत्रसंचालन भिकाजी भोज यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)