जुन्या ठेकेदारालाच मुदत वाढीचा सपाटा

पिंपरी – महापालिकेच्या भोसरी येथील जलतरण तलावाच्या देखभाल-दुरुस्ती व साफसफाईच्या निविदा प्रक्रियेला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने जुन्या ठेकेदारालाच मुदतवाढ देण्यात आली आहे.

महापालिकेच्या क्रीडा व कला, सांस्कृतिक समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या सभेत या विषयाला मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती संजय नेवाळे होते. भोसरी येथील जलतरण तलावाची देखभाल दुरुस्ती तसेच साफसफाईचा ठेका हे 2015-16 या वर्षात चिंचवड येथील सुमीत स्पोर्टस्‌ ऍन्ड फिटनेस इक्‍वीपमेन्ट यांना दोन वर्षासाठी देण्यात आले होते. त्यासाठी दरमहा 1 लाख 34 हजार 750 रुपये या प्रमाणे वर्षाचे 16 लाख 17 हजार व दोन वर्षाचे 30 लाख 87 हजार रुपयांचा ठेका देण्यात आले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या कामाची 31 डिसेंबर 2018 रोजी मुदत संपली होती. त्यानुसार क्रीडा विभागाने ई-निवीदा जाहीर केल्या. तरी त्याला अल्प प्रतिसाद मिळत असल्याने क्रीडा समितीने सुमीत स्पोर्टस्‌ ऍन्ड फिटनेस इक्‍वीपमेन्ट, चिंचवड यांनाच मुदतवाढ देण्यात आली. ई-निविदा प्रक्रीयेला योग्य प्रतिसाद मिळत नाही व नवीन ठेकेदाराचा पर्याय उपलब्ध होत नाही तोपर्यंत हे काम सुमीत स्पोर्टस्‌ यांच्याकडेच जुन्याच दराने कायम ठेवले जाणार आहे. तसा प्रस्ताव क्रीडा समितीने मंजूर करुन तो स्थायी समितीच्या मान्यतेसाठी पाठविला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेचे एकूण 12 जलतरण तलाव आहेत. यांच्या देखभालीचे काम देखील सुमीत स्पोर्टस्‌ ऍन्ड फिटनेस इक्‍वीपमेन्ट यांना देण्यात आले आहे. या कामाची मुदत 2017 डिसेंबर रोजी संपत होती. यामध्ये भोसरी जलतरण तलावाचा समावेश नव्हता. मात्र यावेळीही ई-निविदा प्रक्रियेला योग्य तो प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे सुमीत स्पोर्टसलाच हे कंत्राट देण्यात आले. हिच परिस्थिती भोसरी जलतरण तलावाच्या निविदेबाबत घडल्याने एकाच ठेकेदाराला पोसण्याचा सपाटा क्रीडा समितीने लावल्याची टीका होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)