पिंपरी-चिंचवड : ‘हे’ आहेत नवे आठ स्थायी समिती सदस्य

पिंपरी – महापालिका मुख्यसभेत गुरूवारी स्थायी समितीतील आठ जागांसाठी निवड झाली. भाजपकडून आरती चोंधे यांना सदस्यत्व देण्यात आले असून शिवसेनेचे राहुल कलाटे यांना सदस्यत्व पद मिळाले आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंकज भालेकर, मयूर कलाटे व  अपक्ष आघाडीकडून झामाबाई बारणे यांना सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे.

भाजपच्या सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, अर्चना बारणे, विकास डोळस, अपक्ष साधना मळेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजू मिसाळ, मोरेश्‍वर भोंडवे आणि शिवसेनेचे अमित गावडे यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ फेब्रुवारीअखेर संपुष्टात आला आहे. त्यांच्या जागी नवीन सदस्यांची नियुक्‍त्या करण्यात आली आहे. नियुक्‍त्यांसाठी सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चांगलीच चुरस वाढली होती. यावेळी भाजपच्या आरती चोंधे, शीतल शिंदे, संतोष लोंढे, राजेंद्र लांडगे यांना संधी देण्यात आली. दरम्यान, सत्ताधारी भाजपच्या पाच सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. निवड होणाऱ्या भाजप सदस्यापैकी एकाची सभापतीपदी वर्णी लागणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)