पिंपळगाव तलावातून विद्युत पंप जप्त

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची कारवाईनंतर शेतकऱ्यांची पळापळ

नगर- महापालिकेच्या पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथील तलावातून अनधिकृतपणे पाणी उपसा करणारे सात विद्युत पंप आणि 50 स्टार्टर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जप्त केले आहेत. पाणीटंचाईचे संकट लक्षात घेते. जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे. टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी जिल्ह्यातील तलावांमधील पाणीसाठे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख महादेव काकडे यांनी सांगितले.

पिंपळगाव माळवी हा तलावता पावसाचे पाणी साचलेले आहे. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तलावातील हे पाणी विद्युत पंप लावून उपसा करण्याचा सपाटा लावला होता. टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी पिंपळगाव तलावाची पाणी केली. त्यावेळी तलावातील पाणी अनधिकृत विद्युतपंप टाकून उपसा होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला संबंधित शेतकऱ्यांना विद्युत पंप काढून घेण्याच्या सूचना केल्या. काही शेतकऱ्यांनी पंप काढून घेतले. परंतु काहींनी घेतले नाही. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आज सकाळी पथक घेऊन तलावातून पाणी उपसा करणारे विद्युत पंप जप्त करण्यास सुरूवात केली. सात विद्युत पंप जप्त केले. कारवाई सुरू होताच काही शेतकऱ्यांनी विद्युत पंप काढून घेऊन गेले. परिसरात शेतकऱ्यांनी बसविलेले 50 स्टार्टर देखील महापालिकेच्या पथकाने जप्त केले. महापालिकेच्या या कारवाईने पिंपळगाव माळवीच्या आजूबाजूचा शेतकरी चांगलाच धास्तावला आहे.

रात्रीतून पाणी चोरी होण्याची भीती

आरक्षित केलेल्या पाण्याची तलावातून रात्रीतून चोरी होण्याची शक्‍यता काहींनी वर्तवली आहे. मध्यरात्री विद्युत पंप टाकून तलावातील पाणी उपसा होण्याची शक्‍यता आहे. महापालिकेचा पाणीपुरवठा यावर नियंत्रण ठेवणार का, असा प्रश्‍न केला जात आहे. ही पाणी चोरी थांबविण्यासाठी रात्रीचे गस्त पथक नेमण्याची मागणी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)