जमीन बळकावण्यासाठी बनावट दस्त नोंदणी

तोतया इसमास उभे करणाऱ्या वकिलासह पाच जणांवर गुन्हा

पिंपरी – पुण्यातील पर्वती येथील जमीन गिळंकृत करण्याच्या उद्देशाने खोट्या नावाचा इसमाला सह दुय्यम निबंधक कार्यालयात हजर करुन जमीनीचे इच्छापत्र लिहुन घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी वकिलासह पाच जाणांवर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्ररकणात मंगेश दिनकर कुलकर्णी या अज्ञात नावाच्या इसमासह खोटा दस्त तयार करणारा प्रसाद सुदाम पाटील, ऍड. उमेश चंद्रशेखर मोरे, किशोर शांताराम सकट, अमोल बापु थोरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हवेलीचे प्रभारी सह दुय्यम निबंधक अनिरुद्ध प्रकाश सोनटक्के (वय-37) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ऍड. उमेश मोरे याने पुण्यातील पर्वती येथील जमीन हडपण्यासाठी मंगेश दिनकर कुलकर्णी नावाचा खोटा इसम तयार करुन त्याला दुय्यम निबंधक कार्यालयात हजर केले. तसेच तोतया व्यक्तीने आपणच दिनकर कुलकर्णी असल्याची कागपत्रे निबंधक कार्यालयात सादर केली. कुलकर्णीने आपले मृत्यूपत्राचा दस्त प्रसाद पाटील याच्याकडून तयार करुन पर्वती येथील जमीन दत्तात्रय गिरी यांच्या नावाने केली. दस्त नोदणी करताना ऍड. उमेश मोरे याने आणि साक्षीदार यांनी त्यांची कागदपत्र दुय्यम निबधक कार्यालयात सादर केली होती.

रविंद्र बराटे यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात तक्रारी अर्ज दाखल करुन हा दस्त बनावट व बोगस असल्याची तक्रार केली होती. बराटे यांनी केलेल्या अर्जाची छाननी करण्यात आली असता ऍड. उमेश मोरे याने पर्वती येथील जमीन गिळंकृत करण्यासाठी खोटे इसम सादर केल्याचे तपासात समोर आले. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी हवेलीचे प्रभारी दुय्यम निबंधक यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणीपोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे
करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)