बंगळुरूच्या टाईपरायटरने ‘असे’ रेखाटले विंग कमांडर अभिनंदन यांचे चित्र

बंगळुरू : भारतीय सीमांमध्ये घुसलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना पाकिस्तानात पिटाळताना पाकिस्ताच्या हाती लागलेल्या भारतीय हवाई दलाचा विंग कमांडर अभिनंदन यांच्या शौर्याची गाथा अवघ्या देशाने अनुभवली आहे. अभिनंदन यांच्या अद्वितीय शौर्यामुळे त्यांचे देशभरातून कौतुक होताना दिसत आहे. अशातच आता विंग कमांडर अभिनंदन यांच्या शौर्याला दाद देण्यासाठी बंगळुरू येथील एका टाईपरायटरने नामी शक्कल लढवली असून त्यांनी आपल्या मॅन्युअल टाईपरायटरद्वारे अभिनंदन यांचे हुबेहूब चित्र रेखाटले आहे.

याबाबत, एका वृत्तसंस्थेने वृत्त दिले असून ए सी गुरुमूर्थी नामक या टाईपरायटरने आपल्या मॅन्युएल टाईपरायटरद्वारे विंग कमांडर अभिनंदन यांचे चित्र रेखाटल्याबाबत सांगितले आहे की, “अभिनंदन हे देशाचे खरे हिरो आहेत! त्यांच्या शौर्यामुळे अवघ्या देशाला त्यांच्यावर गर्व आहे. त्यांचे शौर्य पाहूनच मी त्यांचे छायाचित्र रेखाटण्याचा निर्णय घेतला.”

https://twitter.com/ANI/status/1108707029747752961

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)