पियाजीओ पर्यावरण पूरक वाहनाची निर्मीती करणार 

नवी दिल्ली: पियाजीओ व्हेईकल्स हीं कंपनी आगामी काळात पर्यावरण पूरक पर्यायी इंधनावर भर देणार असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दियेगो ग्रॅफी यांनी सांगीतले. कंपनीचा भारतात बारामती येथे उत्पादन प्रकल्प असून त्यात आतापर्यंत 25 लाख इतक्‍या व्यावासाईक वाहनांची निर्मीती करण्यात आली आहे.
ते म्हणाले की, आता कंपनीने सीएनी आणि एलपीजीवर चालणारी तीन चाकी वाहने भारतात सादर केली आहेत. या वाहनासाठी वारंटीचा कालवधी वाढविण्यात अला आहे. त्याबरोबर त्यासाठी एक लाख रुपयाचा अपघात विमा देण्यात येणार असल्याचे यावेळी कंपनीचे अध्यक्ष रवी चोप्रा यांनी सांगीतले. कंपनीची उत्पादन क्षमता वर्षाला 3.5 लाख वाहनांची आहे. कंपनी भारतात वाहन विक्री करण्याबरोबरच परदेशातही मोठया प्रमाणात निर्यात करते असे त्यानी सांगीतले.
ह वाहने संशोधन आणि विकासासह भरतातच तयार करण्यात आली आहेत. निर्यातीमूळे परकीय चलन मिळण्यासही मदत होत असल्याचे त्यानी सांगीतले. चोप्रा म्हणाले की, भारातील कंपनीचा मुळ कंपनीच्या जागतीक कामकाजातील सहभाग वाढू लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)