करीनाने पोस्ट केले न्यू इयर सेलिब्रेशनचे फोटो

बॉलीवूडमधील हॉट कपल करीना कपूर आणि सैफ अली खान हे आपला मुलगा तैमूरसह स्विझरलॅंडमध्ये
न्यू इयर सेलिब्रेशन करत आहेत. या सेलिब्रेशनचे काही फोटो करीनाने पोस्ट करत चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

तैमूरच्या दुस-या वाढदिवसानिमित्त ते दक्षिण आफ्रिकेला गेले होते. त्यानंतर न्यू इयर सेलिब्रेशन करण्यासाठी ते लंडनला गेले. करीनाने आपल्या इंस्टाग्रामवर कुटुंबियांसह आपले काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये करीना ब्ल्यू कलरच्या हाई स्टिल गाउनमध्ये खूपच हॉट लूकमध्ये दिसून येत आहे. याशिवाय तिने सैफ आणि मुलगा तैमूरचे काही फोटोही डालनलोड करत सर्वांना नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, दीपिका पादुकोणच्या रिसेप्शन पार्टीत करीनाने परिधान केलेला गाउन देखील खुप व्हायरल झाला होता. यावेळी तिचा बॅकलेस फोटोला अनेकांनी पसंती दिली होती. करिनाने “वीरे दी विडिंग’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये कमबॅक केले होते. या चित्रपटाला बॉक्‍स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळाला होता. तसेच करीनाच्या अभिनयाचाही प्रेक्षकांनी प्रशंसा केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)