#फोटो – ‘कवच प्रहार’ युद्ध प्रात्यक्षिकाचा थरार…

पुणे – दूरवर तळ ठोकून बसलेल्या शत्रूच्या तळांचा अचूक वेध घेत, त्यांना उद्‌ध्वस्त करणारा तोफांचा मारा… हवेतून येणाऱ्या शत्रूचा अचूक निशाणा साधून त्यांचा केलेला नाश… तसेच शत्रू सैन्याकडून सातत्याने होणाऱ्या माऱ्याचा सामना करतच भारतीय तोफांनी अतिशय वेगवानपणे वाटचाल करत शत्रूसेनेच्या तळांवर मिळवलेला ताबा आणि त्यानंतर जवानांनी केलेला जल्लोष, युद्धभूमीवरील या रोमांचकारी प्रसंगाचा थरार सोमवारी अनुभवायला मिळाला.

तब्बल 2 तासांच्या या युद्धप्रात्यक्षिकामध्ये प्रत्यक्ष युद्धभूमीचा वास्तवदर्शी थरार सादर करण्यात आला. या युद्धप्रात्यक्षिकामध्ये सैन्य दलाची शान असलेले तसेच लष्काराच्या युद्ध क्षमतेला बळकटी देणारे अर्जुन, भीष्म, अजय, टी-90, टी-72, बीएमपी-2 या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा तोफा, विशेष कॉम्बट व्हेइकल तसेच लढाऊ हेलिकॉप्टर यांचा समावेश होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)