#फोटो : कोहिनूरपेक्षाही दुप्पट मोठा हिरा भारतात; किंमत माहिती आहे का?

हैद्राबाद – जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा ब्रिटनच्या ताब्यात असला तरी भारतात कोहिनूरपेक्षा दुप्पट आकाराचा हिरा आहे. या हिऱ्याचे नाव ‘जेकब डायमंड’ असे ठेवण्यात आले आहे. 

दिल्लीमधील राष्ट्रीय वस्तूसंग्रहालयामध्ये सध्या हैद्राबादच्या निजामांच्या आभूषणांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. येथे हा दुर्मिळ हिरा पाहण्याची संधी सर्वसामान्यांना मिळणार आहे.  हा हिरा १८५ कॅरेटचा असून याची बाजारात किंमत जवळपास ४०० कोटींच्या जवळपास असल्याचे सांगितले जाते आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या हिऱ्याव्यतिरिक्त १७३ मौल्यवान वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यात अनेक रत्नजडित वस्तूंचा समावेश आहे. यातील अनेक मौल्यवान वस्तू या १७व्या ते १८ व्या शतकात म्हणजे २०० ते ३०० वर्षापूर्वी घडवण्यात आलेल्या आहेत.

हैद्राबादचे शेवटचे निजाम मीर ओस्मान अली यांनी स्थापित केलेल्या ट्रस्टच्या ताब्यामध्ये असलेल्या आभूषणांचा संग्रह भारत सरकारने १९९५ ला २१८ कोटींना खरेदी केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)