#फोटो : ‘कलंक’ चित्रपटाचे पोस्टर तुम्ही पाहिले का?

मोस्ट अवेटेड ‘कलंक’ चित्रपटातील स्टारकास्टचे लुक्स आता रिलीज होत आहेत. गुरुवारी मुख्य भूमिकेतील वरून धवन, संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर यांचे पोस्टर्स रिलीज झाले. तर आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आलिया भट्टचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. आलिया भट्ट कलंकमध्ये रूपच्या भूमिकेत झळकणार आहे. तर वरून धवन जफर, संजय दत्त बलराज चौधरी आणि आदित्य रॉय कपूर देव चौधरींच्या भूमिकेत दिसणार आहेत.

कलंक या चित्रपटाची दिग्दर्शन अभिषेक वर्मन यांनी केले आहे. तर निर्मिती साजिद नाडियडवाला, हीरू यश जोहर, अपूर्व मेहता आणि कारण जोहर यांनी केली आहे. हा चित्रपट १९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)