दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकली आहे. सौंदर्या हिचा विवाह व्यावसायिक आणि अभिनेता विशागन वनानगामुडी याच्यासोबत पार पडला. सौंदर्या आणि विशालचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सौंदर्या आणि विशालचा विवाहसोहळा चेन्नईच्या द लीला पॅलेसमध्ये पार पडला. यावेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानीस्वामी तसेच कमल हसननेही उपस्थिती लावली होती. या विवाहसोहळ्यास अनेक कलाकार उपस्थित होते.
दरम्यान, रजनीकांतला दोन मुली असून एकीचे नाव ऐश्वर्या आहे, तर दुसरीचे नाव सौंदर्या आहे. सौंदर्या घटस्फोटीत असून तिला पाच वर्षांचा मुलगा देखील आहे. सौंदर्याने २०१० मध्ये चेन्नईस्थित व्यावसायिक अश्विन याच्यासोबत लग्न केले होते. पण या दोघांच्या वैवाहिक जीवनात वारंवार खटके उडत असल्याने तिने २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. काही चित्रपटांचे दिग्दर्शनही सौंदर्याने केले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा