झोपेसाठी फिलिपाईन्सच्या अध्यक्षांनी टाळली शिखर परिषद 

सिंगापूर – झोपेसाठी फिलिपाईन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो दूतेर्ते यांनी शिखर परिषदेतील बैठक टाळली आहे. सिंगापूर येथे चालू असलेल्या आसियान-भारत आणि पूर्व एशिया शिखर परिषदेच्या बैठकीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जगभरातील अनेक नेते सहभागी झाले. मात्र फिलिपाईन्सचे अध्यक्ष या बैठकीला अनुपस्थित राहिले. कारण त्यांना झोप पुरी करायची होती. आणि असे चार कार्यक्रमांच्या वेळी झाले.

याबाबत दुतेर्ते यांच्या प्रवक्‍त्यानेच स्पष्टीकरण केले आहे, की दुतेर्ते यांची झोप पुरी झालेली नसल्याने त्यांनी झोप घेण्यासाठी कार्यक्रमांना हजर राहणे टाळले. अध्यक्ष हे रात्री उशिरापर्यंत काम करत असतात. त्यांची झोप पूर्ण होत नसल्यानेच ते बैठकांना उपस्थित राहिले नाहीत. त्यासाठी अन्य काहीही कारण नाही. दुतेर्ते यांच्या प्रकृतीचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असे सांगून प्रवक्ते साल्वाडोर पनेलो यांनी दुतेर्ते यांच्या प्रकृतीबाबतच्या शंकाकुशंकांना पूर्णविराम दिला आहे. गेल्या महिन्यात त्यांना कॅन्सर झाला असल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती.

-Ads-

आवश्‍यक ती झोप घेण्यात काय वाईट आहे? असा प्रश्‍न खुद्द दुतेर्ते यांनीच केला आहे. दुतेर्ते यांनी यापूर्वीही अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय बैठका झोपेसाठी टाळल्या आहेत. आणि आसियान शिखर परिषदेदरम्यान असे करणारे दुतेर्ते हे एकटेच नेते नाहीत. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांनीही अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांच्या प्रतीक्षेदरम्यान झोप काढली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)