फलटण नगरपरिषदेची स्वच्छतेच्या दिशेने वाटचाल

शहर अस्वच्छ करणाऱ्यांना आर्थिक दंड होणार

फलटण – स्वच्छ महाराष्ट्र अभियान व स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत फलटण नगर परिषदेची स्वच्छ फलटणच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. त्या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी, सर्वत्र स्वच्छता मोहिम सुरु असून त्याचाच एक भाग म्हणून शहरामध्ये खाजगी खुल्या जागांची स्वच्छता, रस्त्यावर फिरणारी मोकाट जनावरे, रस्त्यावर घाण करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे असे प्रकार करणाऱ्यावर तसेच अस्वच्छता करणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई फलटण नगर परिषद करणार आहे. तरी नागरिकांनी सार्वजनिक टिकाणी अस्वच्छता, थुंकणे, लघुशंका करू नये अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल असे निवेदनात म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जो कोणी रस्ते , मार्गावर घाण करेल त्याला 180/- रुपये दंड , सार्वजनिक ठिकाणी थुंकेल त्याला 150/- रुपये दंड , जो कोणी उघड्यावर लघवी , लघुशंका करेल, त्याला 200/- रुपये दंड करण्यात येईल, जो कोणी उघड्यावर शौच करेल त्याला 500/- रुपये दंड करण्यात येणार असल्याचे फलटण नगर परिषदेने जाहीर केले आहे. फलटण शहरातील खुल्या जागेच्या मालकांनी, आपली खुली जागा स्वच्छ करणे व त्याला कुंपण करणे ही त्यांची वैयक्तिक जबाबदारी आहे. अशा खुल्या जागेत अस्वच्छता, घाण, काटेरी झुडूपे, कचरा, दुर्गंधी पसरविणारे सामान व इतर अस्वच्छता पसरविणारे सामान आढळलेस त्यांच्यावर प्रति प्लॉट 10,000/- रूपये एवढे प्रशासन शुल्क तसेच साफसफाईचा खर्च आकारण्यात येणार आहे.

ज्या नागरिकांच्या मालकीचे मोकाट जनावरे, मोकाट वराह शहरात मोकाट फिरत असताना आढळून आल्यास जनावरे जप्त करून परत ताब्यात दिली जाणार नाहीत. तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे ही नवेदनात नमुद केले आहे. शहरातील सर्व जुने पाण्याचे स्त्रोत जसे खंदक, विहीर यामध्ये नागरिकांनी कचरा टाकू नये अन्यथा त्यांच्यावर 10,000/- दंड व कायदेशीर कारवाई करणेत येणार आहे.

शहरात 100 टक्के प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. फक्त पर्यावरण पुरक कापडी पिशव्यांचा वापर अपेक्षित आहे. तसेच सजावटीसाठी वापरले जाणारे थर्माकॉलही 100 टक्के बंदी आहे. कोणीही वरील वस्तुचा वापर करताना आढळलेस प्लास्टिक बंदी अधिनियम 2018 नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहिती नगर पालिकेच्या वतिने देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)