#PulwamaAttack : देशभरातील पेट्रोल पंप आज संध्याकाळी २० मिनिटे बंद 

मुंबई – पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज संध्याकळी सर्व पेट्रोल पंप बंद राहणार आहेत. द कन्सोर्टियम ऑफ इंडियन पेट्रोलियम डीलर्सने (सीआयपीडी) हा निर्णय घेतला असून यामध्ये महाराष्ट्रातील पेट्रोल डीलर्स संघटना (फामपेडा) सहभागी होणार आहे.

सीआयपीडीच्या सर्व पेट्रोल पंपावर बॅनर आणि फोटो लावून तिथले दिवे आज संध्याकाळी ७ ते ७.२० दरम्यान मालवले जातील. तसेच दोन मिनिटं मौन पाळून शहीदांना आदरांजली वाहण्यात येईल. भारतीय सैन्याप्रती असलेली कृतज्ञता आणि ऐक्य दर्शवण्यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन पेट्रोल डीलर्सने केले आहे. गैरसोय टाळण्यासाठी वाहनधारकांनी विहित वेळेआधी पेट्रोल-डिझेल खरेदी करावे, अशी विनंती पेट्रोल पंप संघटनेने केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)