…तर पेट्रोल चे दर 15 रुपयांनी कमी होतील : सुभाष देसाई

कोल्हापूर:  पेट्रोल दर वाढी वरून राज्यात अनेक आंदोलन होत आहे. सरकारनं पेट्रोल 5 रुपयाने स्वस्त केलं असलं तरी शिवसेना समाधानी नाही. पेट्रोलवर सर्वाधिक कर असल्याने राज्य आणि केंद्र सरकारने ते तातडीने मागे घ्यावे म्हणजे पेट्रोल 15 रुपयांनी स्वस्त होऊ शकत अस उद्योग मंत्री सुभाष देसाई  यांनी स्पष्ट केलं. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान ,आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याचं उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी जाहीर केलं आहे.
उद्योग मंत्री सुभाष देसाई हे आज विविध कार्यक्रमांसाठी कोल्हापुरात आले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली . यावेळी आमदार राजेश क्षीरसागर आमदार सुजित मिणचेकर आमदार प्रकाश आबिटकर उपस्थित होते
यावेळी देसाई म्हणाले, राज्यातील उद्योगासंदर्भात आपण पुढील महिन्यांत नवीन धोरण जाहीर करत असल्याचं स्पष्ट केलं तसेच राज्यातील नव्या उद्योग धोरणामुळे अनेक उद्योगांना याचा फायदा होणार असल्याचं त्यांनी केली. तसंच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याचं देसाई यांनी म्हटलं आहे .  पेट्रोल दर वाढी वरून राज्यात अनेक आंदोलन होत आहे. सरकारनं 5 रुपये दरवाढ जरी कमी केली असली तरी शिवसेना समाधानी नाही. पेट्रोलवर सर्वाधिक कर असल्याने राज्य आणि केंद्र सरकारने ते तातडीने मागे घ्यावे म्हणजे पेट्रोल 15 रुपयांनी स्वस्त होऊ शकत अस देखील देसाई यांनी स्पष्ट केलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)