पेट्रोल दरात पुन्हा वाढ सुरु; दिलासा फार काळ टिकला नाही

पुणे – केंद्र आणि राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी तब्बल पाच रुपयांनी पेट्रोलचे दर कमी केले पण आजपासून पुन्हा पेट्रोलच्या दरात थोड्या थोड्या पैशांनी वाढ होऊ लागली आहे. म्हणजे काल दिलासा दिला आणि आज पुन्हा वाढ अशी स्थिती झाली आहे.

दोन दिवसापुर्वी म्हणजे गुरुवारी केंद्र शासनाने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अडीच रुपयांनी कपात करत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर तातडीने राज्य सरकारने सुद्धा अडीच रुपये व्हॅट मध्ये कमी केले. त्यामुळे पेट्रोल तब्बल पाच रुपयांनी स्वस्त झाले. नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्‍त केले. एकदम पाच रुपयांनी कमी झाल्याने थोडा दिलासा सुद्धा नागरिकांना मिळाला होता पण हा दिलासा फार काळ टिकेल असे वाटत नाही. कारण आजपासून पेट्रोल व डिझेलचे दर पुन्हा थोड्या थोड्या पैशांनी वाढू लागले आहेत.

-Ads-

ज्या दिवशी म्हणजे पेट्रोल व डिझेलचे दर राज्य शासनाने कमी केले त्यादिवशी पेट्रोल पुण्यात प्रति लिटर 86.81 रुपये होते त्यानंतर आज म्हणजे शनिवारी अठरा पैशानी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलचा दर हा 87.03 रुपये झाला आहे. डिझेलची स्थिती मात्र थोडी वेगळी आहे. गुरुवारी डिझेलचा दर 76.10 रुपये होते त्यात शनिवारी साठ पैशांनी घट होऊन हा दर 75.45 रुपये झाला आहे.त्यामुळे डिझेलच्याबाबतीत थोडा दिलासा असला तरी पेट्रोल ने मात्र थेंबथेंबे तळे साचे याप्रमाणे वाढ होण्यास सुरवात केली आहे.म्हणजे सरकारने जनतेच्या समधानासाठी एकदम पाच रुपये कमी करायचे आणि नंतर हळूहळू पद्धतीने वाढ करत राहायची असा प्रकार सुरु आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)