दिल्लीमध्ये या वर्षभरात पेट्रोल ‘13.88’ तर डिझेल ‘15.55’ रूपयांनी महागले

प्रमुख शहरातील आजचे इंधनाचे दर

मुंबई : पेट्रोल (91.20), डिझेल (79.89)

पुणे : पेट्रोल (91.04), डिझेल (78.52)

चेन्नई : पेट्रोल (87.18), डिझेल (79.57)

कोलकत्ता : पेट्रोल (85.65), डिझेल (77.10)

दिल्ली : पेट्रोल (83.85), डिझेल (75.25)

जयपूर पेट्रोल (84.28), डिझेल (77.57)

पिंपरी चिंचवड (91.09), डिझेल (78.51)

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीसह इतर राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये मंगळवारी पुन्हा एकदा वाढ झाली असून इंधनदरवाढीचे सत्र आजही कायम अाहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे सत्र काही थांबताना दिसेना. आज दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये लीटरमागे 0.12 पैसे आणि डिझेलच्या दरामध्ये लीटरमागे 0.16 पैशांनी वाढ झाली आहे.

या दरवाढीमुळे दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 83.85 रुपये तर डिझेलचे दर प्रतिलीटर 75.25 रुपये इतक्‍या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. तर देशाची अार्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल 0.12 आणि डिझेल 0.17 पैशांनी महागले आहे. मुंबईत प्रति लीटर पेट्रोलसाठी 91.20 रूपये तर प्रति लीटर डिझेलसाठी 79.89 रूपये मोजावे लागत आहे. तर पुणे शहरात आज प्रति लीटर पेट्रोलचा 91.04 रूपये तर डिझेलचा प्रति लीटर 78.52 रूपये असा दर आहे.

वर्षभरात पेट्रोल ‘13.88’ तर डिझेल ‘15.55’ रूपयांनी महागले

दिल्लीमध्ये 1 जानेवारी 2018 रोजी पेट्रोलचा दर 69.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर 59.70 रुपये प्रति लिटर असा होता. जानेवारी 2018 महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते आजच्या तारखेपर्यंत पेट्रोलचे दर 13.88 रूपयांनी तर डिझेलचे दर 15.55 रूपयांनी महागले आहे.

-Ads-

इंधन दरवाढीमुळे जनता अक्षरशः मेटाकुटीला

या इंधनदरवाढीमुळे इतर जीवानश्यक वस्तूंचे दरसुध्दा वाढत असून सामान्य नागरिकांचे महागाईने कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. इंधन दरवाढीमुळे नागरिकांच्या संतापाचा भडका उडत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)