एक वर्षात 11.45 रूपयांनी वाढले डिझेल

नवी दिल्ली – महागाईने वैतागलेल्या मध्यवर्गीयांच्या चिंतेत आणखी भर पडली असून सोमवारी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. ही दरवाढ अभूतपूर्व असून स्वातंत्र्यानंतरची सर्वांत उच्चांकी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात घडणाऱ्या घडामोडींमुळे देशांतर्गत इंधनाच्या दरांवर परिणाम होत असून, त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत असल्याचे तेल विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून सागितले जात आहे.

दिल्लीमध्ये मागील एक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने बदल होत असल्याचे दिसून येत आहे. आज राजधानी दिल्लीसह इतर शहरात पेट्रोलच्या दरात लिटरमागे 31 पैसे तर डिझेलमध्ये 39 पैसे वाढ झाली आहे.  त्यामुळे आज दिल्लीमध्ये पेट्रोल 79.15 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 71.15 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.

दिल्लीमध्ये पहिल्यांदाच डिझेलचे दर 70 रूपयांच्या पुढे गेले आहेत. मागील एका महिन्यापासून आजपर्यंत दिल्लीमध्ये पेट्रोल 3 रूपये प्रति लिटर तर डिझेल 3.40 रूपये प्रति लिटरने महाग झाले आहे. तसेच एका वर्षात दिल्लीमध्ये डिझेलचे भाव 11.45 रूपयांनी वाढले आहे. भारतात 80 टक्के इंधन हे परदेशांकडून आयात केले जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात घडणाऱ्या घडामोडींचा परिणाम आपल्याकडील इंधनांच्या किंमतींवर होतो. आगामी काळातदेखील या किंमती वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

दिल्लीशिवाय इतर प्रमुख शहरातील आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुढीलप्रमाणे :

मुंबई – पेट्रोल (86.56 रूपये), डिझेल (75.54 रूपये)
चेन्नई – पेट्रोल (82.24 रूपये), डिझेल (75.19 रूपये)
कोलकत्ता – पेट्रोल (82.06 रूपये), डिझेल (74.00 रूपये)
पुणे – पेट्रोल (86.42 रूपये), डिझेल (74.24 रूपये)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)