पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधर्थ केंद्रीय मंत्र्याची बैलगाडी रपेट

नवी दिल्ली: पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधर्थ केंद्रीय मंत्री विजय गोयल यांनी चांदणी चौकातू बैलगाडीची रपेट मारली. पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत त्यांनी दिल्लीच्या आप सरकारवर निशाणा साधला आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे जनता हैराण झाली आहे. इतर राज्यांप्रमाणे दिल्ली सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करून जनतेला दिलासा द्यावा अशी त्यांनी मागणी केली आहे. जर केजरीवाल सरकारने डिझेल आणि पेट्रोलचे दर कमी केले नाहीत, तर जोरदार आंदोलन छेडण्यात येईल असे त्यांनी दिल्ली सरकारला बजावले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे केवळ ट्‌विटरवर चिंता व्यक्‍त करतात, प्रत्यक्षात त्यांना सर्वसामान्य जनतेची पर्वा नाही, महसूल कमी होण्याची चिंता न करता त्यांनी जनतेचे हित पाहावे असे विजय गोयल यांनी म्हटले आहे.

शनिवारी दिल्लीत पेट्रोलच्या दरात लिटरमागे 18 पैशांची आणि रविवारी 14 पैशांची वाढ झाली. जनतेची मागणी केजरेवाल सरकारपर्यंत पोहचवणे हाच आपला बैलगाडीची रपेट करण्यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)