दरकपात नको, करकपात करा- शिवसेना  

पाच रुपयांची फुंकर म्हणजे केवळ वाऱ्याची झुळूक

मुंबई – केंद्र आणि राज्य सरकारने काल पेट्रोल-डिझेल दरांमध्ये कपातीचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार राज्यात पेट्रोलचे भाव 5 रूपयांनी तर डिझेलचे भाव 2.50 रूपयांनी कमी झाले. ही  पेट्रोल-डिझेल दरांमध्ये अल्प कपात करण्याची सरकारला झालेली सद्बुद्धी म्हणजे देशवासीयांचे नशीबच असा टोला शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातील अग्रलेखातून सरकारला लगावण्यात आला आहे.

-Ads-

तसेच सरकारने कुठे तरी सामान्य जनतेचा विचार केला आणि जनआक्रोश ध्यानात घेऊन छोटी का होईना दरकपात केली याबद्दल सरकारचे आभार मानायला आणि स्वागत करायला काहीच हरकत नाही, असे सुध्दा म्हटले आहे. तसेच सरकारने या दरकपातीचा ढोल बडवू नये, सोशल मीडियावरून आभार प्रदर्शनाचे कार्यक्रम सुरू करू नयेत असे सुध्दा ठणकावून सांगण्यात आले आहे.

 खरेखोटे सरकारलाच ठाऊक

पेट्रोल आणि डिझेलचे दर अवाच्या सवा वाढवून आजवर जे शोषण केले त्याचे काय? आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव वाढल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर आपसूकच वाढतात असे छापील उत्तर आजवरची सर्वच सरकारे देत आली. यातील खरेखोटे सरकारलाच ठाऊक. या सरकारच्या आधी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती थेट 143 डॉलर्स प्रति बॅरलवर जाऊन पोहचल्या होत्या तरीही आजच्या एवढी पेट्रोल-डिझेलची दरवाढ त्यावेळी झाली नव्हती. याउलट विद्यमान सरकार सत्तेवर आल्यानंतर जागतिक बाजारपेठेतील तेलाच्या किमती 29 डॉलर्सपर्यंत घसरून त्या पातळीवर स्थिरावल्या होत्या. मात्र तरीही आपल्याकडील पेट्रोल-डिझेलचे भाव चढेच का राहिले याचे उत्तर कोणीच देत नाही. असा सवालही या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.

पेट्रोल–डिझेलचे दर अवघ्या 50 ते 60 रुपयांवर येऊ शकतील

करांच्या बेसुमार ओझ्यामुळेच पेट्रोल–डिझेलचे भाव गगनाला भिडतात हे अर्थसूत्र आज सत्तेवर असलेल्या राज्यकर्त्यांनीच विरोधी बाकावर असताना देशातील जनतेला समजावून सांगितले होते. त्यामुळे केंद्राने मनात आणले आणि करांचे ओझे कमी केले तर पेट्रोल–डिझेलचे दर अवघ्या 50 ते 60 रुपयांवर येऊ शकतील. पाच रुपयांची फुंकर म्हणजे केवळ वाऱ्याची झुळूक आहे. महागाईचा राक्षस खरेच मारायचा असेल तर दरकपात नव्हे, करकपातच करावी लागेल, असा सल्ला सुध्दा अग्रलेखातून सरकारला देण्यात आला आहे

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)