पेट्रोल, डिझेलच्या दरात सलग पाचव्या दिवशी वाढ

नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सोमवारी सलग पाचव्या दिवशी वाढ झाली आहे. चार मोठ्या उपनगरात पेट्रोलचे दर सरासरी 38 ते 40 पैसे तर डिझेल 44 ते 53 पैसे प्रति लीटर महागले आहे.

राजधानी दिल्ली मध्ये पेट्रोलचे दर 38 पैसे वाढून 70.13 रूपये आणि डिझेलमध्ये 49 पैसे वाढ होऊन 64.18 रूपये प्रति लीटर झाले आहे. 23 डिसेंबर नंतर पहिल्यांदाच दोन्ही इंधनाचे दर उच्चतम स्तरावर पोहचले आहेत. मागील पाच दिवसात पेट्रोल 1.63 रूपये आणि डिझेल 1.94 रूपये प्रति लीटर महागले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल 75.77 रूपये आणि डिझेल 67.18 रूपये प्रति लीटर झाले आहे. कोलकत्तामध्ये पेट्रोल 72.74 आणि 65.95 तर चेन्नईमध्ये पेट्रोल 72.79 आणि 67.78 रूपये प्रति लीटर पर्यंत पोहचले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)