शैक्षणिक मराठा आरक्षणाला याचिकाकर्त्यांचा आक्षेप

 आयोगाकडे लोकसंख्येनुसार आकडेवारी नव्हती

मुंबई: मागास प्रवर्ग आयोगाने मराठा समाजाला आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण देण्याच्या शिफारशीलाच याचिकाकर्त्यांनी जोरदार आक्षेप घेतला. राज्य सरकारने आयोगाकडे केवळ सरकारी नोकरीसंदर्भात मराठा समाजाची असलेली आकडेवारी सादर केली होती. शैक्षणिक क्षेत्रातील आकडेवारी सादर केली नव्हती. मात्र आयोगाने नोकऱ्यांबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस केली, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला.

आरक्षण कायद्यात नव्याने दुरुस्ती करून 16 टक्के मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या आणि आरक्षणाला समर्थन देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर आज तिसऱ्या दिवशी सुनावणी झाली.

यावेळी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या डॉ. उदय ढोपले यांच्यावतीने ऍड. श्रीहरी अणे यांनी काल अपूर्ण राहिलेल्या युक्तीवादाला आज सुरूवात केली. राज्य सरकारने आयोगाकडे जी आकडेवारी दिली होती ती केवळ नोकऱ्यांच्या संदर्भात होती. मात्र आयोगाने त्याच आकडेवारीवर अहवालात शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. नोकरी संदर्भात जमा केलेली आकडेवारी जर शैक्षिणक क्षेत्रासाठी वापरली असेल तर ते योग्य नाही. त्यासाठी लोकसंख्येनुसार स्वतंत्र आकडेवारी जमा केली गेली पाहिजे, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.

आरक्षणाच्या 50 टक्‍क्‍याला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर ओबीसीमध्ये देता असले असते, असा दावाही ऍड. अणे यांनी केला. राज्य सरकारने ओबीसीमध्ये अनेक जातींचा समावेश केला आहे. त्यापैकी आरक्षण दिल्यानंतर काही जाती प्रगत झालेल्या आहेत. त्यांचे आरक्षण काढून घेऊन त्यात मराठा समाजाचा समावेश करता आला असता. घटनेत एकदा दिलेले आरक्षण काढून घेता येणार नाही, असे कोठेही नमुद केलेले नाही, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.

तसचे शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण दिल्यानंतर यावर्षापासुन ते लागे होणार नाही, असे जरी राज्य सरकार म्हणत असले तरी काही वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आरक्षण ठेवण्यात आल्या आरक्षणाला अंतरीम स्थगिती द्यावी, अशी विनंती केली. आजही सुनावणी अपूर्ण राहिल्याने न्यायालयाने पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीपर्यंत तहकूब ठेवली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)