पीटर मुखर्जीला वैद्यकिय जामीन देण्यास हायकोर्टाचा तूर्त नकार

मुंबई – बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जीला वैद्यकिय कारणास्तव जामिन देण्यास उच्च न्यायालयाने आज नकार दिला. मात्र प्रकृती अस्वस्थ्याचे कारण लक्षात घेत 15 दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यास परवानगी दिली. तसेच पुढील सुनावणीच्यावेळी पीटरच्या प्रकृतीचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश जेल प्रशासनाला देऊन याचिकेची पुढील सुनावणी 12 जूलैपर्यंत तहकूब ठेवली.

शीना बोरा हत्याकांड प्रकरणी आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या पिटर मुखर्जीने बायपास सर्जरी झाल्यानंतर तुरुंगात आजारपण बळावण्याची शक्‍यता असल्याने आपल्याला वैद्यकिय कारणास्तव जामीन मिळावा म्हणून कनिष्ट न्यायालयात अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर पिटरच्या वतीने ऍड. श्रीकांत शिवदे यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. त्या अर्जावर न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांच्यासमोर आज सुनावणी झाली. यावेळी पिटरच्या वतीने ऍड. शिवदे यांनी कारागृहातील वैद्यकिय सुविधांवर प्रश्‍न चिन्ह उभे केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कारागृहात हार्टचा पेशन्ट असल्याने कारगृहातील वातावरणामुळे संसर्गजन्य आजाराचा प्रार्दुभाव होण्याची भीती व्यक्त केली. तसेच कार्डियाक स्पेशालिस्ट नसल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. याला सीबीआयच्या वतीने जोरदार विरोध करण्यात आला. पीटरच्या प्रकृतीची गंभीर दखल घेत न्यायालयाने त्याला पंधरा दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी देताना पुढील सुनावणीच्यावेही पीटरचा वैद्यकिय अहवाल सादर करण्याचे निर्देश जेल प्रशासनाला दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)