साडेसोळा लाख विद्यार्थ्यांना देण्यात येणार जंतनाशक गोळ्या

पुणे – बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमी दोष हा व्यापक आणि मुलांना कमजोर करणारा आहे. कृमिदोष हा रक्‍तक्षय आणि कुपोषणाचे कारण तर आहेच, त्याशिवाय बालकांची बौद्धीक आणि शारिरीक वाढ खुंटण्याचेही कारण ठरते. यावर मात करण्यासाठी येत्या 10 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

1 ते 19 वर्षे वयोगटांतील सर्व मुलां-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवून त्यांची पोषण स्थिती, शिक्षण आणि जीवनाचा दर्जा उंचावणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू असून, जिल्ह्यातील 16 लाख 37 हजार 661 मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग आदींच्या मदतीने ही मोहीम यशस्वी होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. जिल्हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी एन. पी. मित्रगोत्री यांनीही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. जंतनाशक गोळी रिकाम्या पोटी घेवू नये, असेही यावेळी सांगण्यात आले. या मोहिमेच्या जनजागृतीसाठी सर्व शाळांमधून 8 ऑगस्ट रोजी प्रभातफेरी काढण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)