माझ्या विधानाचा विपर्यास; पंतप्रधानपदाच्या ‘त्या’ वक्तव्यावर पवारांचे स्पष्टीकरण 

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएला पुन्हा स्पष्ट बहुमत मिळणे अतिशय कठीण आहे. त्यामुळे पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती हे तीन जण मला पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार वाटतात, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केले होते. परंतु, शरद पवारांनी माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे म्हंटले आहे.

शरद पवार म्हणाले कि, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींशिवाय पंतप्रधानपदासाठी अन्य पर्याय कोण असतील, या प्रश्नावर उत्तर देताना मी ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि मायावती यांचे नाव घेतले. राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार नाहीत, असे मी म्हणत नाही, असे स्पष्टीकरण  त्यांनी दिले.

दरम्यान, शरद पवार यांनी सोमवारी सकाळी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शरद पवार म्हणाले, देशात स्थिर सरकार असणे गरजेचे आहे. यासाठी संसदेत एक जबाबदार लोकप्रतिनिधी पाठवणे गरजेचे आहे. मुंबईकरांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

https://twitter.com/ANI/status/1122714408713687040

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)