पोर्त ऍलेग्री – पेरू संघाने गतविजेत्या चिली संघावर 3-0 असा सनसनाटी विजय नोंदवित कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत 44 वर्षांनंतर अंतिम फेरी गाठली.
रविवारी होणाऱ्या अंतिम लढतीत त्यांची ब्राझील संघाशी गाठ पडणार आहे. या स्पर्धेतील साखळी सामन्यांमध्ये पेरू संघाला ब्राझील संघाने 5-0 असे पराभूत केले होते. एडिसन फ्लोरेस, योशिमार योतून व पाओलो गुरेरो यांनी प्रत्येकी एक गोल करीत त्यांच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.