पेरु घन लागवड (भाग-2)

अमोल विलास क्षिरसागर,डॉ.सचिन सदाफळ 
उद्यानविद्या विभाग, मफुकृवि., राहुरी.
कमी जागेत अधिक उत्पादन देणारे तंत्रज्ञान 
पारंपारीक पेरु लागवड : 
पारंपरीक पध्दतीमध्ये पेरुची 66 मीटर अंतरावर लागवड केली जाते. यात एकरी 111 झाडे व हेक्‍टरी 277 झाडांची लागवड केली जाते. लागवड केल्यानंतर तिस-या वर्षानंतर उत्पादनास सुरुवात होते फळांच्या काढणीनंतर छाटणी केली जात नाही त्यामुळे बागेमध्ये फांद्यांची दाटी होते, सुर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहचत नाही व जमीन लवकर वाफसा स्थितीमध्ये येत नाही झाडाभोवती गोल किंवा चौकोनी आळे तयार करुन जास्त प्रमाणात पाणी दिले जाते बागेमध्ये ओलावा आणि आर्द्रता वाढल्यामुळे फळमाशीचे प्रमाण वाढते शेणखत किंवा सेंद्रिय खताचा वापर कमी केल्यामळे फळांचे आकार वाढत नाही आणि पुढे लवकर परिपकत्व होऊन गळतात. एकरी झाडांचा संख्या कमी असल्याने घन लागवडीच्या तुलनेत कमी उत्पादन मिळते.
पेरु घन लागवड : 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी कमी जागेत, अल्प कालावधीत फायदेशीर उत्पादन घेण्यासाठी पेरु कलमांची 3 बाय 2 मीटर अंतरावर घन लागवड करण्याची शिफारस केली आहे यात एकरी 666 झाडे व हेक्‍टरी 1666 झाडांची लागवड केली जाते .
घन लागवड बाग व्यवस्थापन तंत्रज्ञान : 
मे महिन्यात 60बाय 60 बाय 60 सेमी आकाराचा खड्डा घेऊन त्यात पाच किलो शेणखत, अर्धा किलो सिंगल सुपर फॉस्फेट 25 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर, पी एस बी आणि ट्रायकोडर्मा व पोयटा मातीने भरुन, जुनच्या शेवटच्या आठवड्यात वरील शिफारशीत अंतरावर पेरु कलमांची लागवड करावी.
दोना महिन्यानंतर (सप्टेंबर दरम्यान) रोपाचा शेंडा जमिनीपासून दोन फूट उंचीवर छाटावा व त्यानंतर दोन महिन्यांनी (नोव्हेंबर) प्रत्येक रोपावर चार दिशेने चार प्राथमिक फांद्या ठेवाव्यात. त्यापुढे दोना महिन्यांनी (जानेवारी) या प्राथमिक फांद्यांची 50 टक्के छाटणी करुन शेंडयाकडील कोवळी फुट काढावी सरते शेवटी, पुढील हिवाळयात (नोव्हेंबर- सप्टेंबर दरम्यान) पेरुचे पहिले फळ – उत्पादन घेण्यासाठी, द्वितीय फांद्याची मे महिन्याच्या दुस-या पंधरवाडयात 50 टक्के छाटणी करुन तळाकडील पक्व भाग राखावा तसेच पावसाळी हंगामात (जून-जुलै दरम्यान) दुसरे फळ उत्पादन घेण्यासाठी, जानेवारीच्या पहिल्या आठवडयात फांद्याची 50 टक्के छाटणी करावी वर्षातून दोनदा फळ उत्पादन घेण्यासाठी, प्रत्येक वर्षी दोनदा छाटणी (मे व जानेवारी) तसेच दोनदा खत व्यवस्थापन (जून व जानेवारी) या सदर तंत्रज्ञानाच्या अत्यावश्‍यक बाबी आहेत
सुरुवातीच्या बाग व्यवस्थापनेसाठी (सुरुवातीची 3.5 वर्षे करीता) पुढीलप्रमाणे खत व्यवस्थापन करावे. प्रथम वर्षी, जून लागवडीनंतर सप्टेंबर व जानेवारी महिन्यात 75:30:30 ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश प्रति झाड या प्रमाणात रासायनिक खते द्यावीत तर दुसऱ्या वर्षी 130:75:75 ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश व 25 ग्रॅम प्रत्येक ऍझोटोबॅक्‍टर, पी एस बी आणि ट्रायकोडर्मा प्रति झाड या प्रमाणात अन्नद्रव्ये खते जून व जानेवारी महिन्यात द्यावीत जूनमध्ये 5 किलो शेणखत द्यावे तिसऱ्या वर्षी जून महिन्यात 130:75:75 ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश व 25 ग्रॅम प्रत्येक ऍझोटोबॅक्‍टर, पी एस बी आणि ट्रायकोडर्मा प्रति झाड या प्रमाणात जैविक खते व 5 किलो शेणखत द्यावे आणि जानेवारी महिन्यात 205:112:112 ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश प्रति झाड या प्रमाणात अन्नद्रव्ये खते द्यावीत.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)