पेरु घन लागवड (भाग-१)

अमोल विलास क्षिरसागर, डॉ.सचिन सदाफळ 
उद्यानविद्या विभाग, मफुकृवि., राहुरी.
कमी जागेत अधिक उत्पादन देणारे तंत्रज्ञान 
पेरु हे कमी पाण्यावर येणारे कणखर व फायदेशीर पिक आहे. फळांची रुचकर चव, भरपूर प्रमाणात असणारे “क’ जीवनसत्व तसेच खनिजद्रव्ये यामुळे पेरु लोकप्रिय आहे पेरुच्या फळापासूा जॅम, जेली, आईस्क्रीम, सरबत तसेच हवाबंद डब्यातील फोडी तयार करता येतात पेरु हे कमी खर्चाचे, तुलनेने कमी मेहनतीचे व हमखास उत्पादन देणारे पीक असल्याने याच्या लागवडीस भरपूर वाव आहे
हवामान आणि जमीन : 
उष्ण आणि समशितोष्ण हवामानात पेरुची लागवड करतात 20 ते 35 अंश से. तापमान पिकाच्या वाढीसाठी पोषक आहे. सोम्य उन्हाळा व कडक हिवाळा मानवतो. पेरुच्या झाडाची ताण सहन करण्याची क्षमता जास्त असल्याकारणाने दुष्काळी भागात सुध्दा पेरुची यशस्वी लागवड करता येते महाराष्ट्रात वर्षभर कमी जास्त प्रमाणात पेरु फळे उपलब्ध असतात. महाराष्ट्रात पेरुचा मृग बहार घेण्याची शिफारस आहे. मृग बहार धरल्यास जून जुलै महिन्यात फुले येतात व फळे हिवाळयात नोव्हेबर डिसेबर महिन्यात पक्व होतात.
लागवडीसाठी जमीनीची निवड करतानां जमीन पाण्याचा योग्य निचरा होणारी तसेच हलकी व मध्यम ते काळी जमीन व सामू 6.5 ते 7.5 आहे अशी जमीन लागवडीस योग्य आहे
सुधारीत जाती : 
पेरुच्या अनेक सुधारीत जाती उपलब्ध आहेत यापैकी व्यापारीदृष्ट्या सरदार (लखा -49), अलाहाबाद सफेद, ललित, नि विलास या जातींची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते यामध्ये सरदार (लखा -49) हया जातीची महाराष्ट्रातील बहुतांशी क्षेत्रावर या जातीची लागवड करण्यात आली आहे. डॉ. चिमा यांनी 1969 साली प्रादेशीक फळ संशोधन केद्र, गणेशखिंड, पुणे येथे हि जात विकसीत केली आहे. याची झाडे ठेंगणी असुन ती आडवी वाढतात. फळे चवीला गोड आहेत. फळांचा गर पांढरा रंगाचा आहे. बियांचे प्रमाण कमी आहे.
पेरुची अभिवृध्दी व लागवड: 
पेरुची अभिवृध्दी दाब कलम पध्दतीने करतात पेरुच्या लागवडीसाठी जोमदार वाढीची आणि निरोगी कलमे निवडावीत 60 60 60 से.मी. आकाराचा खड्डा खोदावा. खड्ड्याच्या बुडाला अर्धवट कुजलेला पालापाचोळा पसरुन घ्यावा. खड्डा भरताना यामध्ये 1 ते 2 घमेले चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत, पोयटा माती, अर्धा किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 100 ते 150 ग्रॅम फॉलिडॉल पावडर, 100 ग्रॅम निंबोळी पेंड, प्रत्येकी 25 ग्रॅम ट्रायकोडर्मा, ऍझाटोबॅक्‍टर व पी.स.बी पावडर टाकावे कलमांची लागवड कमी पावसाच्या भागात पावसाळयाच्या सुरुवातीला आणि जास्त पावसाच्या भागात पाऊस संपल्यावर म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये करावी लागवड केल्यानंतर नवीन झाडाला काठीचा आधार द्यावा कलमांना सुरुवातीला पाण्याचा ताण पडू देऊ नये.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)