‘परफ्युम’चा टीजर लाँच

सुगंधित परफ्युमवरून फुलणाऱ्या प्रेमाची कहाणी ‘परफ्युम’ या चित्रपटातून अनुभवता येणार आहे. नुकताच दिवा येथे रंगलेल्या अखंड कोकण महोत्सवात या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला. १ मार्चला या “परफ्युम”चा सुगंध संपूर्ण महाराष्ट्रात दरवळणार आहे.

‘हलाल’ सारख्या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केलेल्या, तसेच आगामी ‘लेथ जोशी’ चित्रपटाची प्रस्तुती करणाऱ्या अमोल कागणे फिल्म्सच्या अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांनी ‘परफ्युम’ची प्रस्तुती केली आहे. एचआर फिल्मडॉमच्या डॉ. हेमंत दीक्षित आणि ओंकार दीक्षित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर दिग्दर्शक आणि कॅमेरामन म्हणून करण तांदळे यांनी काम पाहिले आहे. ओंकार दीक्षित आणि मोनालिसा बागल यांच्यासह चित्रपटात सयाजी शिंदे, चिन्मय मांडलेकर, कमलेश सावंत, अभिजित चव्हाण, अनिल नगरकर, भाग्यश्री न्हालवे, हिना पांचाळ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. किशोर गिऱ्हे यांची कथा असून, पॉल शर्मा यांनी संकलन केलं आहे. प्रोडक्शन हेड म्हणून स्वप्नील दीक्षितने काम पाहिले आहे

प्रेम हे सुगंधित अत्तरासारखं असतं असं म्हटलं जातं. या चित्रपटाच्या टीजरमधून नायक-नायिकेत परफ्युममुळे फुलणारं प्रेम दिसत आहे. मात्र, या प्रेमाचे रंग कसे बदलत जातात, या प्रेमकथेला थ्रीलर वळण कसं मिळणार याचीच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळेच चित्रपटाच्या टीजरला सोशल मीडियात भरभरून प्रतिसाद मिळत आहे. १ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)