वेध बोटावरच्या शाईचा

वडणूक काळात फसवणूक, बहुमतदान आणि गैरव्यवहार आदी गोष्टी टाळण्यासाठी मतदारांच्या बोटावर अविस्मरणीय/पक्‍क्‍या शाईने ज्याला मतदारांची शाई असे म्हटले जाते, त्या शाईने खूण केली जाते. ही सर्वसाधारण शाई नसते, एकदा का ती बोटावर लावली की काही महिने ती पुसली जात नाही. भारतात कर्नाटक सरकारच्या अखत्यारितील म्हैसूर पेंटस्‌ वर्निश लिमिटेड (एमपीव्हीएल) यांना या शाईचे श्रेय जाते. भारताबरोबरच विविध देशांना एमपीव्हीएलकडून या शाईचा पुरवठा केला जातो.

गुणवत्तापूर्ण पक्‍क्‍या शाईचे उत्पादन आणि पुरवठा करण्यामध्ये एमपीव्हीएलची विशेषतः आहे. यासाठी एमपीव्हीएलला भारतीय निवडणूक आयोग, राष्टीय पदार्थ विज्ञान, प्रयोगशाळा आणि राष्टीय संशोधन विकास महामंडळ यांचे सहकार्य लाभत आहे. अशा प्रकारच्या विश्‍वासार्ह पक्‍क्‍या शाईचे एमपीव्हीएल हे एकमेव अधिकृत पुरवठादार आहेत. नवी दिल्लीतील राष्टीय संशोधन विकास महामंडळाकडून त्यांना 1962 सालापासून यासाठी विशेष परवाना मंजूर करण्यात आला आहे. भारतातील निवडणुकांव्यतिरिक्‍त म्हैसूर पेंटस्‌ वर्निश लिमिटेड 1976 पासून 28 देशांना या पक्‍क्‍या शाईचा पुरवठा करत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)