निवडणुकांमध्ये जनताच त्यांना धुळीत मिळवेल! : संघाच्या मुखपत्रातून ठाकरेंना प्रत्युत्तर

नागपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येनंतर पंढरपूरमध्ये मोठी सभा घेतली. या दोन्ही सभांमध्ये त्यांनी राम मंदिरावरुन भाजपला लक्ष्य केले. पंढरपूरच्या सभेत “जागा वाटप गेले खड्‌डयात…’ असे म्हणत त्यांनी भाजपवर एकप्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. याला आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मुखपत्राच्या आग्रलेखात “उद्धव ठाकरेंना बोलण्याचे भान नाही, आगामी निवडणुकांमध्ये जनताच त्यांना धुळीत मिळवल्याशिवाय राहणार नाही, असा शब्दांत हल्लाबोल केला आहे.

तर ते आंधळे..
शिवसेनेच्या नेत्यांचाही संघाने समाचार घेतला आहे. “पर्यावरण मंत्री रामदास कदम, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर शेलक्‍या शब्दात टीका करतात. यावरुन शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची लायकी समजते. 18-18 तास काम करणाऱ्या पंतप्रधानांना जर ठाकरे कुंभकर्ण म्हणत असतील तर ते आंधळे आहेत. सर्व काही दिसत असूनही दिसत नसल्यासारखे बोलत असतील तर त्यांना ढोंगी म्हणावे लागेल.

अग्रलेखात म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांना काय बोलावे, काय बोलू नये, आपण काय करत आहोत, काय करायला पाहिजे याचे भान राहिलेले दिसत नाही. उद्धव ठाकरे सरकारला चोर म्हणतात याचा अर्थ ते स्वत:च्या मंत्र्यांनाही आणि पक्षालाही चोर म्हणत आहेत. त्यांना असे वाटत आहे की, आपण काय करतोय हे जनतेला कळत नाही. परंतु आगामी निवडणुकांमध्ये जनता त्यांना धुळीत मिळवल्याशिवाय राहणार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्रात आणि राज्यातही भाजपसोबत शिवसेना सत्तेत आहे. असे असतानाही उद्धव ठाकरे सातत्याने सरकारविरोधी बोलताना दिसतात. तसेच “पहारेकरी चोर आहे, असे बोलून उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधीची री ओढत पंतप्रधानपदाचा अवमान केला आहे. पण आपण राजकारणात किती अपरिपक्व आहोत याचे त्यांनी दर्शन घडवले. सरकारमध्ये राहण्याचा मोह शिवसेना आवरु शकली नाही, सत्ता सोडण्याची शिवसेनेत हिम्मतही नाही, असा खडेबोलही सुनाविले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)